‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करुन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना २५ लाखांची तात्काळ आर्थिक मदत द्या

0
53
.राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
गडचिरोली –तालुक्यात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नाहक लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे त्या नरभक्षक वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करुन वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना तात्काळ २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वनमंत्री मा. संजय राठोड तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली.
गडचिरोली तालुक्यात हैदोस माजविणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली तालुक्यातील संपूर्ण नागरिकांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. व चर्चा करण्यात आली. व त्यांनंतर मुख्य वनसंरक्षक यांचा सोबत नरभक्षक वाघच लवकरात लवकर बंदोबस्त करा. अन्यथा मागण्या पूर्ण न झाल्यास ओबीसी स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी मुख्य वनरक्षक डॉ. मानकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाद्यक्ष राहुल मुंनघाटे जिल्हामहासाचिव राहुल भांडेकर ,पंकज खोबे, जिल्हाकाऱ्यद्यक्ष सुरज डोईजड, वैभव जुवारे, रमेश कोठारे बहुसंख्य ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.