Home विदर्भ श्रीनगरात ‘घेऊन जा गेss मारबत…’चा जल्लोष

श्रीनगरात ‘घेऊन जा गेss मारबत…’चा जल्लोष

0

गोंदिया-. शहरातील श्रीनगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये श्री युवा मानव सेवा दलातर्फे पोळा सणच्या पाडव्याच्या निमीत्ताने संपूर्ण श्रीनगर परिसरात मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी नगर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी दलातील सदस्यांनी ‘इळा, पीळा, पिंगला व कोरोनाला घेऊन जा गेss मारबत’चा एकच जल्लोष केला.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मारबत सणावर विरजन पडले होते. तर याही वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असतनाच व प्रशासनाकडून निर्बंध असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबांत्मक नियमांचे पालन करत सर्वत्र मारबत सण साजरा करण्यात आला. या अनुषंगाने श्रीनगर परिसरातील युवा मानव सेवा दलाचया वतीने मिरवणूक काढून पोळ्याचा पाडवा मारबत उत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, श्री युवा मानव सेवा दलातर्फे मारबत उत्सव मागील 10 वर्षांपासून साजरा होत असून यावर्षी सुद्धा प्रभाग क्रमांक 17 येथील चंद्रशेखर वॉर्डातील मालवीय शाळा जवळून श्री युवा मानव सेवा दलातर्फे दिलीप मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत मारबतची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मारबतला पाहण्याकरिता परिसरातील नागरिकांसह, महिला व लहान चिमुकल्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, सदर मिरवणूकीचे समापन बाजपेयी चौकात करण्यात आले. यावेळी दिलीप मिश्रा, विक्रांत (लल्ला) मिश्रा, राजेश वाढई, जगदीश तिडके, सुनील रोकडे, अनिल डोरले, विकास मिश्रा, दीनदयाल मेश्राम, महेश शेंद्रे, शैलेश यादव, किरण वघारे, शुभम धुवारे, शुभम पांडे, विवेक पांडे, अब्बू नेवरे, प्रशिक राऊत, यश नेवरे व परिसरातील बालगोपालांसह युवक तसेच युवा मानव सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version