Home विदर्भ ऑनलाइन काळात बालपणापासुनच पूस्तक वाचन पद्धतीचा अवलंब करने गरजेचे- आदेश गणवीर

ऑनलाइन काळात बालपणापासुनच पूस्तक वाचन पद्धतीचा अवलंब करने गरजेचे- आदेश गणवीर

0

▪️बोझा-यात मुलाना महामानवांचे ऐतिहासिक साहित्य पुस्तका देऊन साजरा केला तान्हा पोळा

गुदमा- “आजच्या ऑनलाइन युगात पूस्तकांपासुन दुर होत असलेल्या विद्यार्थ्याना बालपणापासुनच वाचन पद्धतीचा अवलंब करने गरजेचे आहे व त्यासाठी वेळेवर पालकानी मुलांकडे लक्ष देऊन त्यांच्यात पूस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करने आवश्यक आहे” असे प्रतिपादन वरिष्ठ रेल्वे परिचालक आदेश गणवीर यानी केले. कोविड नियमांचे पालन करित ग्राम गुदमा येथे तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रम सुरुवातीला नंदी ची पूजा अर्चना करुन उपस्थीत बालकाना बोझारा म्हणून महामानवांची इतिहास गाथा असलेले बोधपूर्ण साहित्य पूस्तका आदेश गणविर परिवारातर्फे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला आयोजक मंडळचे राजू तरोणे, डॉ. प्रल्हादजी वाढई, श्यामलालजी बोहरे, दूलिरामजी भाकरे (तंटामुक्त अध्यक्ष गुदमा), रंजीत गणवीर (सामाजिक कार्यकर्ता) अनिल साऊस्कर, सुरेंद्र ब्राह्मणकर, घनश्याम वंजारी, धनराज मौजे,
अतुल सतदेवे (संयोजक, संविधान मैत्री संघ गोंदिया) मयारामजी ब्राह्मणकर, दिवाकर कांबळे (नागपूर), प्रियंका गणवीर, हर्षा सतदेवे, जुही गणवीर आदि प्रामुख्याने उपस्थीत होते.

शास्त्री वार्डात युवा बहुजन मंचचा तान्हा पोळा

गोंदिया:- शहरातील शास्त्री वॉर्ड येथे युवा बहुजन मंचच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचाचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, जितेश राणे, सुनील तिवारी, गजानन तरोणे, दिवाकर बिसने, केसरीचंद बिसेन, राजू भेलावे, राजू रहांगडाले, विजय क्षीरसागर, कुंभलकर, शैलेश अंबुले, अजय यादव, ओमेन्द्र पारधी, मगनलाल कावळे, राजू वैद्य, पन्नालाल ठाकरे, ललित गुप्ता, बिट्टू यादव इत्यादी प्रमुखतेने उपस्थित होते.

 

error: Content is protected !!
Exit mobile version