ई पिक पाहणी कृषी विभागामार्फत करावी-रतीराम राणे

0
166

अर्जुनी मोरगाव,दि.11ः-शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये असलेले पिक मोबाईल ॲप द्वारे तयार केलेले ई पिक पेरा अनेक अडचणी मुळे होत नाही. शासनाने कृषी ,महसूल व ग्रामपंचायत विभागाद्वारे संयुक्त मोहीम राबवून डाऊनलोड करावे. अशी मागणी अर्जुनी मोरगाव तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष रतिराम राणे यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार प्रफुल पटेल ,आमदार चंद्रिकापुरे यांना पत्र पाठवून केली आहे.
रतिराम राणे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की माझी शेती माझा सातबारा या घोषवाक्याचे आधारे महसूल विभाग व कृषी विभाग ई पिक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्याकडून पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडून याला फारसा प्रतिसाद मिळत नाही मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण , आदिवासी भागात याबाबत माहिती नसल्यामुळे बरेच शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत .
भविष्यात शासकीय धान्य खरेदी केंद्र तसेच इतर शासकीय योजनेपासून शेतकरी वंचित राहू शकतात. शासनाच्या महसूल, कृषी, ग्रामपंचायत विभागामार्फत सध्या याबाबत कसल्याही प्रकारची जनजागरण मोहीम राबविली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अजूनही जनजागृती झाली नाही. याची मुदत 15 सप्टेंबर ची 30पर्यंत वाढविलीअसल्याचे अद्यापही अधिकृत कळली नाही.
शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदणी कृषी ,महसूल व ग्रामपंचायत विभागाद्वारे संयुक्तपणे राबवावी अशी मागणी अर्जुनी मोरगाव तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष रतिराम राणे यांनी केली आहे.