Home विदर्भ सेजगाव खुर्द येथे कोरोना लसीकरण मोहीम

सेजगाव खुर्द येथे कोरोना लसीकरण मोहीम

0

गोंदिया,दि.12ः- तालुक्यातील ग्राम पंचायत सेजगाव खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये  11 सप्टेंबरला कोरोना लसीकरणाचे आयोजन वैद्यकीय अधिकारी बिसेन यांच्या पुढाकाराने करण्यात आले.लसीकरण कार्यक्रम उप-सरपंच प्रमोद पुरणलाल पटले यांच्या अध्यक्षतेमध्ये राबविण्यात येत असून आरोग्य विभागातील आरोग्य सेवक बी. बी. साखरे, आशा सेविका लिल्हारेबाई, पालियाबाई , चिखलोंढेबाई, अंगणवाडी सेविका येळे बाई, गावातील मुले भूमेंस्वर बिसेन, कार्तिक पटले सहकार्य करीत आहेत. गावातील वयोवृध्दापासून ते युवकापर्यंत सर्वांनीच लसीकरणासाठी आग्रह धरल्याने शाळेत कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले, आणि 190 लस लावण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सचिव साखरे मॅडम, ग्राम पं. सदस्य संतोष पटले शाळेचे मुख्याध्यापक कावळे ,बनसोड , ग्राम पंचायत कर्मचारी मुकेश बिसेन, सुभाष खरोले व गावातील प्रतिष्ठित नागरिक लसीकरणासाठी जनजागृती करीत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version