चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आज झोन १ मध्ये रक्तदान शिबिर

0
12

चंद्रपूर, ता. १३ :महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्यात एक असे एकूण ४ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवार, ता. १४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मनपा झोन कार्यालय क्र. १, संजय गांधी मार्केट नागपूर रोड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतांनाच डेंग्यु, मलेरीया या आजारांचे रुग्णसुध्दा सर्वत्र आढळून येत आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. यातील पहिले शिबीर बुधवार, ता. ८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका कार्यालय मुख्य इमारत गांधी चौक येथे पार पडले. अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. १४ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मनपा झोन कार्यालय क्र. १, संजय गांधी मार्केट नागपूर रोड येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येत नगरसेवक, नागरिक आणि कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, झोन सभापती छबू वैरागडे यांनी केले आहे.