खरेदी विक्री संस्थेच्यावतीने संचालक पी.जी.कटरेंचा सत्कार

0
53

गोरेगाव,दि.13ः- गोरेगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या पार पडलेल्या मासीक सभेत संस्थेचे संचालक पी.जी.कटरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे सभापती डाॅ.झामसिंह बघेले व उपसभापती राजेंद्रसिंह राठोड यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी संचालक डाॅ.के.टी.कटरे,श्रीप्रकाश रहागंडाले,खिरचंद येळे,खेमेंद्र कटरे,व्यवस्थापक नुतन रहागंडाले यांच्यासह संस्थेचे सदस्य कर्मचारी यांनी अभिनंदन केले.