Home विदर्भ मनपा आयुक्तांसह कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

मनपा आयुक्तांसह कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

0
    – झोन १ कार्यालयात शिबीरस्थळी महापौर, स्थायी समिती सभापती, झोन सभापतींची भेट

चंद्रपूर, दिनांक १४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन १ कार्यालयात मंगळवारी (ता.१४) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिराला मनपा कर्मचारी व प्रभागातील नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद देत रक्तदानास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी सुद्धा शिबीराला भेट देत स्वतः रक्तदान केले.

महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी देखील शिबिरस्थळी भेट दिली. डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव असताना रक्ताची कमतरता जाणवू नये हा या रक्तदान शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले. तसेच डेंग्यू-मलेरिया या साथरोगांपासून बचावाकरिता महापालिका प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात येण्याच्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन व वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले. यावेळी झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अतुल चटकी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!
Exit mobile version