मतदार यादीचे छायाचित्रासह पुनरिक्षण कार्यक्रम ३0 सप्टेंबरपयर्ंत अर्ज सादर करावे

0
59

 गोंदिया,दि.16ः ६५-गोंदिया विधानसभा मतदार संघाअंतर्गत १ जानेवारी २0२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचे छायाचित्रासह पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून १ जानेवारी २0२२ रोजी ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा व्यक्तींनी त्यांचे मतदान केंद्रात कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इछड) यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय गोंदिया येथील निवडणूक शाखेत नमूना-६ चे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे.
तसेच जे मतदार मृत/कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेले आहेत अशा मतदारांचे मतदार यादीतून नाव वगळणी करण्यासाठी त्यांचे नमूना-७, ज्या मतदारांच्या नावात, छायाचित्र व इतर तपशिलात दुरुस्ती करावयाची आहे अशा मतदारांनी नमूना-८ व ज्या मतदारांना ६५-गोंदिया विधानसभा मतदार संघाअंतर्गत त्यांचे नाव एका मतदान केंद्रातून दुसर्‍या मतदान केंद्रात स्थलांतरीत करावयाचे आहे अशा मतदारांनी नमूना-८ अ चे अर्ज दिनांक ३0 सप्टेंबर २0२१ पयर्ंत संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इछड) यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय गोंदिया येथील निवडणूक शाखेत सादर करावे. असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी कळविले आहे.