आमगावखुर्द येथील जैन खताच्या दुकानावर कारवाईची मागणी

0
102

सालेकसा,,दि.16 -तालुक्यातील आमगाव खुर्द येथील नितीन नरेश कुमार जैन यांच्या रासायनिक खताच्या दुकानात 15 सप्टेंबरला शेतकरी गेले असता दुकानदारांने युरिया खत उपलब्ध असतानासुद्धा शेतकऱ्यांना दिले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार सालेकसा यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार दिली.त्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार शरद कांबळे यांनी सालेकसा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सिंधरामव नायब तहसीलदार वेदी यांनाचौकशी करण्याचे आदेश दिले.सदर खताच्या दुकानात जाऊन चौकशी केले असता जैन ट्रेडर्स या दुकानामध्ये अंदाजे 4 ते 5 वाजेदरम्यान 220 बॅग साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले.जैन ट्रेडर्सकडे रासायनिक खताचा परवाना असल्यामुळे युरिया, कीटनाशक औषधीच्या पुरवठा उपलब्ध असतो.मात्र शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेऊन लूट करीत असल्याची तक्रार होती.शासन निर्णयाप्रमाणे युरिया खताची बॅग 266 रुपये किंमत आहे,मात्र दुकानदार बळजबरीने दुसरे औषध देऊन 550 रुपये घेऊन लूटमार करीत असल्याचेही समोर आले. जैन ट्रेडर्स दुकानात भाव फलकावर किंमत नोंद केली जात नाही. ग्राहकांना पक्के जीएसटी बिल देत नाही. दुकानदार हे किमतीपेक्षा जास्त रासायनिक खत विक्री करतात,ग्राहकांची सही बिलावर घेतली जात नाही,दुकानदार मासिक अहवाल कृषी विभागाला सादर करीत नाही असे चौकशी अधिकारी सिंद्राम यांच्या निदर्शनास आले. जैन ट्रेडर्सचा रासायनिक. खताचा परवाना रद्द करण्यात यावा व उच्चस्तरीय चौकशी करून दुकानदार विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे शेतकर्यांनी दिले आहे. निवेदन देताना आमगाव खुर्द येथील नितेश देशमुख,देवेंद्र इशराम बहेकार,रवींद्र बहेकार,संजय हूकरे, कोमलदेव हत्तीमारे,यादराव नागपुरे लेखराम पाथोडे,ताराचंद हत्तीमारे,प्रकाश वडगाये,सोना बहेकार यांचा समावेश होता.