तालुका किसान आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांचे समस्याचे तहसीलदारांना निवेदन

0
26

अर्जुनी-मोर- तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुका भाजपा किसान आघाडीच्या वतीने माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये पिक पेरा तलाठी किंवा कृषी सहाय्यक मार्फत करण्यात यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशि त्वरित देण्यात यावी ,खरेदी केंद्रावर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी दिलेला बारदाना परत देण्यात यावा किंवा त्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी ,चालू खरीप हंगामातील धान पिकावर मोठ्या प्रमाणावर गादमाशी व इतर किडींचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे संबंधित विभागामार्फत पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ,चालू हंगामातील धान्य खरेदी केंद्र ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू करण्यात यावे तसेच ग्रामीण क्षेत्रातील गावातील पथदिवे वीज जोडणी त्वरित सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष उपेंद्र सिंह टेंबरे ,राज्य कार्यकारणी सदस्या रचनाताई गहाणे, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेव कापगते ,डॉक्टर गजानन डोंगरवार, किसान आघाडी जिल्हा महामंत्री अशोक हरिणखेडे, जिल्हा उपाध्यक्ष रतनलाल बघेले ,देवलाल पटले ,तालुका अध्यक्ष अरविंद शिवनकर, किसान आघाडी तालुका अध्यक्ष खुशाल काशीवार ,जिल्हा महामंत्री लायकर भेंडारकर, भोजराम लोगडे,किसान आघाडी तालुका महामंत्री सतिश कोसरकर,नारायण हटवार, दिगंबर कापगते,मनोहर शिवनकर, देवनाथ सरकार ,लतिका सरकार, वासुदेव बाईन ,धनराज शहरे, वामन ब्राह्मणकर, संपत कठाणे, अण्णा डोंगरवार ,गोपीनाथ लंजे, पंढरी आरसोडे ,रामलाल मुंगणकर, एडवोकेट पोमेश रामटेके ,देवराम कोरे, भूपेश काशिवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.