मुंडीपार ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

0
40

गोरेगांव-:– स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत स्वच्छता विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार गोंदिया जिल्हा परिषद व गोरेगांव पंचायत समितीच्या आदेशान्वये ग्राम पंचायत मुंडीपार मध्ये श्रमदानातून स्वच्छतेची चळवळ राबविण्यात आली. ही मोहिम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहणार नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते व अशीच स्वच्छतेबाबतची क्रांती ग्रामपंचायत मुंडीपार मध्ये घडत आहे असे दिसत आहे. स्वच्छ मुंडीपार अभियानात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छतेच्या कामात सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी सहभागी होत स्वच्छता केली व सर्व बचत गटाच्या महिला संघटनाचे कौतुक केले.
स्वच्छ भारत मिशन 2021 अंतर्गत सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छ मुंडीपार अभियानात मुंडीपार ग्रामवासी दररोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता करत असतात.
आज 17/09/2021 रोज शुक्रवारला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व श्रमदानातुन स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून हातात झाळु व फ़ावळे घेऊन नालीत पडलेला कचरा बाहेर काढला, तर काही ठिकाणी हातात कुराड घेऊन झुडपे तोडली.संपुर्ण गावात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील मोकळ्या जागेतील कचरा, प्लास्टिक उचलण्यात आले.
स्वच्छ मुंडीपार सुंदर मुंडीपार साठी आपले सर्वांचे प्रयत्न खुपच मोलाचे ठरणार आहे.ग्राम मुंडीपार येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तं.मु.स.अध्यक्ष,स.वन व्यव.समिती अध्यक्ष,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व बचत गटाच्या महिला,सर्व अंगनवाडी सेविका,सर्व आशा सेविका व नागरिक या मोहिमेत उतरले आहेत.जोरदार घोषणाबाजीने व कोवीड-19 च्या नियमाचे पालन करुन आजच्या दिवशी सांगता करण्यात आली.