मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटूंबियास 10 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य

0
79

गोंदिया,दि.18 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे मतदानाकरीता 15 जानेवारी 2021 रोजी गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा धापेवाडा येथे निवडणूक कर्तव्य बजावत असतांना अचानक प्रकृती बिघडल्याने पोलीस स्टेशन दवनीवाडा येथील नायब पोलीस शिपाई रुपचंद झनकलाल ढोमणे यांचा मृत्यू झाला. स्व. रुपचंद ढोमणे यांचे वारसांना ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला सानुग्रह अनुदान 10 लक्ष रुपयाचा धनादेश मृतक कर्मचारी यांची पत्नी श्रीमती उर्मिला रुपचंद ढोमणे यांना अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले व प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती लिना फलके यांचे उपस्थितीत देण्यात आला.
00000