ग्रामसेवक यूनियन जिल्हाध्यक्ष पदी कमलेश बिसेन बिनविरोध

0
148

गोंदिया,दि.19- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना गोंदिया जिल्हा शाखेच्या काल शनिवारी (दि.18) झालेल्या वार्षिक अधिवेशनात विद्यमान अध्यक्ष कमलेश बिसेन यांची पुन्हा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

स्थानिक मयुर लॉन्स मध्ये  ग्रामसेवक युनिअनच्या गोंदिया जिल्हा शाखेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या अध्यस्थस्थानी कार्तिक चौहान हे होते. जिल्हा कार्यकारिणीला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी श्री बिसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांची पुढील पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. कार्यकारिणीचे इतर सदस्यांमध्ये मानद अध्यक्ष म्हणून  कार्तिक चौहान सचिनजी कुथे उपाध्यक्ष, भारती वाघमारे उपाध्यक्ष (महिला), कुलदीप कापगते सचिव, शैलेष परिहार कोषाध्यक्ष, लक्ष्मण ठाकरे राज्य समन्वयक, वाय एच बिसेन राज्य समन्वयक,  रजनी शहारे राज्य समन्वयक, रामा जमईवार प्रसिद्धि प्रमुख,  रितेश शहारे संघटक, सुरेश वाघमारे संघटक, टीकाराम जनबन्धु संघटक, योगेश रुद्रकार सहसचिव, पी जी ठाकरे सल्लागार, किशोर आचले सल्लागार, नरेन्द्र गोमासे जिल्हा निमंत्रक,नम्रता रंगारी जिल्हा निमंत्रक(महिला)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.