Home विदर्भ प्रत्येक विभागाने आपआपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी- अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले

प्रत्येक विभागाने आपआपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी- अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले

0

गोंदिया,दि.20 : भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव साजरा करतांना प्रत्येक विभागाने आपआपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे निर्देश अप्पर
जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिले.
20 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व
बालकल्याण) संजय गणवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एल.के.पुराम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी
अभियंता अब्दूल जावेद, पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी
(कनिष्ठ) रेखा बघेले उपस्थित होते.
श्री राजेश खवले पुढे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना प्रत्येक विभागाला जबाबदारी
देण्यात आलेली आहे. त्यानुसार इंडिया @ 75 या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून स्वातंत्र्य लढा, संकल्प,
संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारीत कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी. स्वातंत्र्य चळवळींशी
संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे
सादरीकरण या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात
पत्रव्यवहार करतांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो घेण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version