Home विदर्भ जवाहर नवोदय विद्यालयात जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

जवाहर नवोदय विद्यालयात जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

0

वाशिम, दि. 21  : जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त वतीने 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन आज 21 सप्टेंबर रोजी जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात, युनिसेफचे डॉ. राजेश कुकडे, उपप्राचार्य सुनिता साखरे, जंतनाशक मोहिमेचे जिल्हा समन्वयक महादेव आवारे, नितीन व्यवहारे, जयश्री भालेराव, स्टाफ नर्स चित्रा अरदळे, अविनाश सोनोने, संदीप जाधव व शिक्षक वर्गाची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जे विद्यार्थी आज गोळी घेवू शकले नाही, त्यांना मॉप अप दिनी 28 सपटेंबरला गोळ्या घेण्यास सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 1 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालके,6 ते 10 वर्ष वयोगटातील शाळेत न जाणारी सर्व मुले- मुली, 10 ते 19 वयोगटातील शाळेत जाणारी सर्व मुले-मुली आणि याच वयोगटातील सर्व शाळाबाह्य मुले- मुली यांना जंतनाशक गोळ्या खाण्याबाबत आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशूमुख यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेच्या आणि पोषण सप्ताहाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षिका सुनिता कानोले यांनी मानले.

Exit mobile version