Home विदर्भ जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा तत्वावरील 57 जणांना दिलासा

जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा तत्वावरील 57 जणांना दिलासा

0

गोंदिया – मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्यांना अखेर गणेशोत्सव काळात दिलासा मिळाला. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी रुजू होताच यात लक्ष घालत हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे 57 जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे अनुकंपा तत्वावर या उमेदवारांना सामावून घेण्यासाठी रोस्टर व इतर प्रकिया  अद्यावत करुन घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी गेली वर्षभर परिश्रम घेतले.त्यांच्या या कार्यात अनुकंपा धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी सुभाष खत्री यांनी अनुकंपाचे तर निखील बागडे यांनी वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये पदोन्नतीचे 30 कर्मचार्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करुन पदोन्नतीसाठी  विभागीय आयुक्त कार्यालयापासूनच सर्व कामे पुर्ण करण्यात जबाबदारी पार पाडली.

जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी हा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. अनुकंपा तत्वावर एकूण 57 जणांना नियुक्ती केल्याचा आदेश गणेशस्थापनेच्या रोजी काढला. त्यामुळे अनुकंपा धारकांना मोठा दिलासा मिळाला.

 अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचे प्रकरण देखील गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. वास्तविक पाहता दरवर्षी आढावा घेऊन ही प्रकरणे निकाली काढणे अपेक्षित असते, परंतु अनुकंपाच्या प्रकरणांकडे यापुर्वीच्या सीईओंनी दुर्लक्ष केले. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरीच्या काळात ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली होती. या काळात अन्य कामे बंद असल्यामुळे अनुकंपाची प्रकरणे निकाली काढण्याकडे लक्ष देण्यात आले.57 जणांना अनुकंपात त्वावरील नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे काही वर्षांपासूनची प्रकरणे निकाली निघाल्याचे मानले जात आहे.

नियुक्ती देण्यात आलेल्या प्रवर्ग अशाप्रकारे

परिचर 11, कनिष्ट सहाय्यक लिपिक 10, शिक्षण सेवक 1 ते 5 पर्यंत 03, वरिष्ठ सहाय्यक लेखा 01, कनिष्ठ सहाय्यक लेखा 06, वरिष्ठ सहाय्यक लिपिक 04, कंत्राटी ग्रामसेवक 02, औषध निर्माण अधिकारी 01, आरोग्य सेविका 01, शिक्षण सेवक 6 ते 8 पर्यंत 05, आरोग्य सेवक 08, अंगणवाडी पर्यवेक्षिका 02, शिक्षण सेवक 11 ते 12 पर्यंत  01, कनिष्ठ अभियंता 02 असे 57 जणांचा समावेश आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version