खातेदारांचे पैसे ताबडतोब परत करा : खा.सुनिल मेंढे यांचे निर्देश

0
79

भंडारा : बँकेच्या अभिकर्त्याने दीड कोटीचा अपहार करून खातेदारांचे पैसे काढून घेतले. खातेदार यामुळे अडचणीत आले असून याला बँक प्रशासन पूर्णपणे दोषी आहे. त्यामुळे बँक प्रशासनाचा दोष स्पष्ट करणारा अहवाल तयार करून शक्य तितक्या लवकर खातेदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
आसगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील एका अभीकर्त्याने जवळपास दीड कोटी रुपयांचा अपहार करून बँकेचे खातेदार असलेल्या ग्राहकांना गंड मारण्याचा प्रयत्न केला. त्याने परस्पर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याचा प्रताप केला. या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांच्याकडे ग्राहकांनी लेखी स्वरूपात तक्रार केल्यानंतर आज खासदारांनी प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर खासदारांनी विभागीय व्यवस्थापक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चुक बँक व्यवस्थापनाची आणि बँकेच्या अधिकृत अभिकर्त्याची आहे. त्यामुळे त्याचा आशयाचा अहवाल तयार करून ज्यांच्या खात्यातील पैशाचा अपहार झाला आहे त्यांना ‍यांच्‍या पासबुकचा अभ्यास करून व्याजासह शक्य तितक्या लवकर पैसे परत करण्याच्या दृष्टीने कारवाई करावी असे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. खासदारांच्या भेटीने त्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी अनिल मेंढे, भाजप पवनी शहर अध्यक्ष मोहन सूरकर, आसगांवचे सरपंच विपीन बोरकर, प्रकाश कुर्झेकर, हिरा वैद्य, युवा मोर्चाचे अमोल ऊराडे, शिवा मुंगाटे, धनंजय मुंडेले, ऍड.खेमराज जिभकाटे, प्रमोद मेंढे, संदीप नंदरधने, संजय रत्नपारखी, बंडू जांभुळकर, श्रीपत मरघडे सरपंच शेंद्री, परशुराम समरीत, लोकेश दळवे, दीपक तिघरे, देवानंद खोपे, ऍड.विनायक फुंडे, डॉ.प्रमोद खरकाटे, दिपक कोरे, नेहाल देशमुख, तुळशीराम बिलवने, लीलाधर रेवतकर, विकास जांभुळकर, राहुल खोब्रागडे, प्रवीण वालदे, रवी जांभुळकर, हरिश्चन्द्र भेंडारकर, महेश पुंडे, सोनू भाजीपाले, मोहन कुर्झेकर, राजू भेंडारकर, किरण डोये आदी उपस्थित होते.