
अर्जुनी मोर-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वागिण विकास साधण्यासाठी ग्राम पंचायतींनी पुढाकार घ्यावा . नरेगाच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे सहज करता येतात. सदर योजने अंतर्गत कामामुळे विकासाला गती मिळते, त्याचप्रमाणे गावातील मजूरांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. ७० ग्रामपंचायतींनी प्रत्येकी २ कोटीच नियोजन केल्यास नरेगाच्या माध्यमातून १४० कोटीची कामे करता येतील व कामे करून गावाचा विकासात्मक कायापालट करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार तथा विधान मंडळ रोहयो समितीचे अध्यक्ष श्री मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विशेष निधीमधून अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदार संघात एकूण ९ कोटीची ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे मा . आमदार चंद्रिकापुरे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून त्यापैकी प्रत्येकी रु. ५० लक्षची सिमेंट रस्त्याची कामे बोंडगाव / देवी , निमगांव, धाबेटेकडी यातील ग्रामपंचायतीत असून त्यांचे भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद ” सदस्य लायकराम भेंडारकर , उमाकांत ढेंगे,सरपंच प्रतिमा बोरकर , माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे , नूतन सोनवाने प.स सदस्य , नाजुक कुभरे प.स सदस्य, संदीप कापगते प.स सदस्य.दीपक सोनवाने सरपंच धाबेटेकडी , विश्वनाथ बाळबुध्दे सरपंच निमगांव, उपसरपंच भाग्यवान फुल्लुके , अरविंद जाभुळकर, विजय बाबोर्डे, ग्रा.पं. सदस्य डॉ . श्यामकांत नेवारे , अॅड . श्रीकांत बनपुरकर , अमरचंद ठवरे , डॉ. माधोराव हातझाडे, विनायक मस्के, श्यामराव मस्के, विजय गायकवाड,माया मेश्राम , प्रेमलाल खोब्रागडे, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे राकेश लंजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार शाखा अभियंता प्रदित राऊत , संकल्प जैन,प्रमोद डोंगरे, अविनाश नागपुरे , नित्यानंद पालीवाल , आनंद बोरकर , रवि बनपुरकर , नरेश बोरकर , माधुरी बनपुरकर , प्रभाकर धारगावे इ . प्रामुख्याने उपस्थित होते .
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले. नंतर ग्राम पंचायत सभागृहात ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार चंद्रिकापुरे म्हणाले की , गावाच्या विकासात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे . गावच्या सरपंचानी गावाच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले तर निधीची कमतरता भासणार नाही. विविध माध्यमातून विकास निधी मिळतो. काम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सबब नरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखडा तयार करावा अशी सूचना केली कार्यक्रमाचे संचालन अमरचंद ठवरे यांनी केले तर आभार बनपुरकर यांनी मानले राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम , सचिन नाकाडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.