Home विदर्भ मुंडीपार येथील डुक्करबोळी तलाव खोलीकरण मातीकामाला सुरूवात

मुंडीपार येथील डुक्करबोळी तलाव खोलीकरण मातीकामाला सुरूवात

0

गोरेगांव- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम मुंडीपार येथील जंगल आणि शेती परिसराला लागून असलेल्या डुक्करबोळी तलावाचे खोलीकरण कामाला जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली पं.स.सदस्य सौ.शितलताई सुरेंद्र(बबलु)बिसेन यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.या कामामुळे तलावा लगत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळी वाढ होईल.जंगल लागून असल्यामुळे प्राणी पक्षी यांना फायदा होईल. शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे तसेच पाणी हे पुर्ण उन्हाळ्याभर राहीला पाहिजे तसेच पाळीव व जंगली प्राण्यांची तहान भागली पाहिजे हाही उद्देश ठेवून तलाव खोलीकरणाचा काम केले जात आहे. सदर काम गावातील मजुरांना रोजगार मिळावा या दृष्टीकोनातून करण्यात येत आहे.यावेळी सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, सचिव अरविंद साखरे,, तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी, ग्रा.पं.सदस्य छंदीप ठाकुर, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन, लिपीक सुनिल वाघाडे, परिचर अजय नेवारे,योगेश गमधरे व मजुरांची उपस्थिती होती.

Exit mobile version