Home विदर्भ पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत 19 एप्रिल रोजी

पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत 19 एप्रिल रोजी

0

गोंदिया,दि.13 : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाची अधिसूचना दिनांक 27 नोव्हेंबर 2019 व ग्रामविकास विभागाचे दिनांक 12 एप्रिल 2022 चे पत्रानुसार गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरीता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षित पदांची सोडत दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे वेळी सर्व पंचायत समिती सदस्य व गोंदिया जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी तसेच इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00

Exit mobile version