Home विदर्भ भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात उसळला जनसागर

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात उसळला जनसागर

0

गोंदिया,दि.14ः-परमपुज्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज गोंदिया शहरात निघालेल्या मिरवणुकीने संपुर्ण शहर दणाणून गेले होते.कोरोना काळात 2 वर्ष साध्यारुपात साजरी झालेली जयंती यावर्षी मात्र मोकळीक मिळताच हर्षोल्लासाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.13 एप्रिलच्या रात्रीला 12 वाजता आतिषबाजी करुन जयंतीपर्वास सुरवात करण्यात आली.येथील रामनगर बौध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करुन बौद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर मिरवणुक रॅलीला सुरवात झाली.यावेळी समिती अध्यक्ष डॉ .राजेंद्र वैध, महासचिव.नागरत्न बंसोड, अमर राहुल,अनिल सुखदेवे, हर्षु रंगारी, बसंत गणवीर,जितेंद्र सतिसेवक,निशांत वाहने,सतिश पारधी,अनिल सुखदेवे,धीरज मेश्राम,देवा रुसे,निलेश देशभ्रतार,रतन वासनिक,प्रदिप ठवरे,अनिल रामटेके,हंसू वासनिक,पृथ्वीराज कोल्हटकर,अरविंद साखरे,आशिष रामटेके,राकेश डोंगरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.गोंदिया शहरातील विविध भागातील बुध्दविहारात बुध्दवंदना केल्यानंतर निघालेल्या या मिरवणुका शहराच्या मुख्यमार्गाने भ्रमण करीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन विसर्जित झाल्या. सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका सायकांळी 8 वाजेच्या सुमारास विसर्जित झाल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version