Home विदर्भ विकास कामांना गती देण्यासाठी नगरपंचायतमध्ये आ.चंद्रिकापुरेंनी घेतली बैठक

विकास कामांना गती देण्यासाठी नगरपंचायतमध्ये आ.चंद्रिकापुरेंनी घेतली बैठक

0

अर्जुनी मोरगाव,दि.15ः अर्जुनी नगरपंचायतचा सर्वांगीण विकास आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी नगरपंचायत येथे मुख्याधिकारी,नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसोबत बैठक करीत आढावा घेतला.नगरपंचायतचा विकास आराखडा तयार करून आदर्श नगरपंचायत तयार करावी अशा सूचना केल्या.
नगरपंचायतच्या मागील कार्यकाळात अनेक विकास कामे प्रलंबित राहिली.मात्र या कार्यकाळात प्रलंबित विकास कामांसह नवीन धोरणात्मक निर्णय घेऊन नाविन्यपूर्ण विधायक कामे व्हावी या मानसिकतेने नगरसेवकांनी कार्य करावे.आपण जनतेच्या विश्वासावर खरे उतरलो याचा आत्मिक समाधान मिळेल,असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
बैठकीमध्ये 27 कोटी रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना इटियाडोह प्रकल्पाच्या पाणी आरक्षण आणि वनविभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहे.यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची आमदारांनी कानउघडणी केली.शहरात भुमिगत विद्युतीकरण व्हावे याकरिता उपविभागीय अभियंता अमित शहारे यांच्याशी चर्चा केली. अंदाजपत्रकीय प्रारूप तयार करण्यास सूचना केल्या. शहरातील तलाव,बोडी यांचे सौंदर्यीकरण,नगरात पाच प्रवेशद्वार,समशान भूमीचे सौंदर्यीकरण,विद्युत शवदाहिनी, परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अत्याधुनिक अभ्यासिका निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विकासात्मक नियोजनात येणाऱ्या अडचणी सोडवू.वन हक्क पट्टे आणि घरकुलाची गंभीर समस्या आहे.याकरीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.या अधिवेशनात संबंधाने सभागृहात चर्चा केल्याची माहिती दिली.शहरात सुंदर रस्ते,भूमिगत गटार व्यवस्था ही शहराची ओळख झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, महिला बालकल्याण उपसभापती दीक्षा शहारे, सभापती दाणेश साखरे, नगरसेवक राधेशाम भेंडारकर,शीला उईके,तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष लोकपाल गहाने मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version