पोलिसांनी केलेली टिप्पर जप्तीची कारवाई व्देषभावनेतून – विशाल दसरियांचा आरोप

0
123

सालेकसा,दि.15- सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही महिन्याआधी पिडीतावर खोटे आरोप करून त्याला पोलीस तक्रार करण्याची धमकी देत लाखो रुपयाची मागणी करण्याच्या आरोपाखाली ५ पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते.या घटनेला काही काळ लोटताच आता सालेकसा पोलीस प्रशासनाकडून तक्रारदारावर दबावतंत्राच वापर करीत त्रास देण्यास सुरुवात झाल्याचे तक्रारदार विशाल दशरियांचे म्हणने आहे. तक्रारदाराचे बिल्डींग मटेरियल सप्लायचे व्यवसाय असून टिप्परच्या माध्यमाने आपले व्यवसाय करतात.विशाल यांच्या तक्रारीवर पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी कार्यवाही करत सालेकसा पोलीस स्टेशन येथील ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली होती.
परंतु आता सालेकसा पोलीसांकडून अर्थीक आणि मानसिक त्रास देणे सुरु असून त्यांच्या रेती वाहतुकीचे सर्व दस्तावेज योग्य असूनही त्यांच्यावर कार्यवाही केल्याचा खुलासा विशाल दसरियाने पत्रकारांशी चर्चा करताना केला.त्यांचे टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे २६६९ सध्या पोलीस स्टेशन सालेकसा येथे ७ एप्रिलपासून उभे आहे.त्यामुळे १५-२० हजाराचा आर्थिक भुर्दंड दररोज बसत असल्याचे म्हणने आहे. ७ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११.०० च्या सुमारास आमगाव-सालेकसा रस्त्यावरील गोवारीटोला गावाजवळ अंकुश बनोठे यांच्या दुकानाजवळ पोलीस विभागाच्या रात्री गस्त करणाऱ्या वाहनाने विशाल दसरिया यांचे रेतीची वाहतूक करीत असलेल्या टिप्परला अडवून राँयल्टी बाबत चौकशी केली.त्यावर संबंधित दस्तावेज दाखविल्यावर पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी राँयल्टीबद्दल आम्हाला काही कळत नाही.त्यामुळे सदर प्रकरण तहसीलदाराकडे सुपूर्द करण्यात येत आहे.आणि त्याचा निपटारा तहसीलदार सालेकसा हे करतील असे सांगत गाडी पोलीस स्टेशन सालेकसा येथे लावली.विशाल यांना रेती वाहतुकीचा परवाना (राँयल्टी) रावणवाडी – आमगाव – सालेकसा – फुक्कीमेटा – देवरी मार्गावरील होते.सदर कार्यवाही सुद्धा याच मार्गावर झाल्याने विशाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली व कालावधी सुद्धा योग्य आहे. परंतु याबाबत आम्हाला फार काही कळत नाही, तहसीलदार सालेकसा याबाबत निर्णय घेतील असे म्हणत गाडी पोलीस स्टेशन येथे लावण्यास सांगितले. आज 7 दिवसापेक्षा जास्त वेळ लोटला असून सुद्धा या प्रकरणावर कोणतेही कार्यवाही झाली नसल्याने आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या प्रकरण उपविभागीय अधिकारी देवरीकडे प्रलंबित

सध्या सुरु असलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संपामुळे कार्यवाहीस उशीर होत आहे असे मत उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.या प्रकरणातून जनसामान्यांनी प्रशासनाच्या विरोधात जाऊन यांचे चुका समोर आणावे कि जे होत आहे ते निमुटपणे बघत राहावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलिसांचे प्रकरण समोर आणणे आणि प्रशासनाच्या विरोधात उभे राहिल्याने अश्या खोट्या कार्यवाहीस सामोरे जावे लागत आहे असे विशाल दसरिया यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान सालेकसा पोलीस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक वैशाली पाटिल यांना याबाबत भ्रमणध्वनीवर विचारणा करण्यात आली असता त्यांनी याप्रकरणाबाबत आपण काहीच बोलू शकत नाही असे मत व्यक्त केले.