Home विदर्भ वादळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी; नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी...

वादळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी; नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – मंत्री सुनील केदार

0

नागपूर दि.16 : उमरेड तालुक्यातील शिरपूरखूर्सीपार व भिवापूर तालुक्यातील भगवानपूर येथे नुकताच झालेल्या वादळी पाऊसामुळे अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.  त्याची पाहणी पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी  केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार राजु पारवेजिल्हा परिषदेच्या सभापती नेमावली माटेजिल्हा परिषद सदस्य शंकर दडमलउपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईततहसीलदार कुभेकर, पदाधिकारी, सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित यावेळी होते.

प्रारंभी श्री. केदार यांनी खुर्सीपार येथे भेट देवून नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी तेथील सरंपचाशी संवाद साधला. कोळसा खदानीमुळे जवळपासच्या गावास अशा प्रकारचे धक्के बसत असतात. त्यामुळे नेहमी नुकसानीला बळी पडावे लागते. तसेच गावात पाण्याची उपलब्धता नसल्याने टँकरने पाणी आणावे लागते. यावर कायमस्वरुपी उपाय करण्याचे  त्यांनी सांगितले. याबाबत लवकरच उपाय योजना करण्यात येईलअसे श्री. केदार म्हणाले.

खुर्सीपार येथील भेटीत पडझड झालेल्या घरांची पाहणी करतांना ते घर अतिक्रमण धारकाचे असल्याचे आढळले. यावर त्यांनी  2018 च्या शासन निर्णयानुसार सर्वांना घरे या योजनेच्या यादीत त्यांचा समावेश  करुन संबंधितांना घरे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांना दिल्या.

भगवानपूर येथील भेटीदरम्यान पाहणी करतांना घरावर विद्युत खांब पडून श्री. दिघोरे यांच्या घराचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. परंतु कोणतही जीवीतहानी झाली नसल्याचे आढळून आले. या सर्व नुकसानग्रस्ताचे पंचनामे करुन त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी  नुकसानग्रस्तांना उपजिवेकेचे साधन कोणते आहे. उदरनिर्वाहासाठी जमीन किंवा इतर व्यवसाय आहे कायअशी आस्थापूर्वक विचारणा त्यांनी केली.

या दौऱ्यात त्यांनी पशुपालक देविदास परसराम आत्राम यांचेशी त्यांनी संवाद साधून शेळीपालनाबाबत चर्चा केली. शेळ्या किती प्रजातीच्या आहेत. त्यांचे बाजारभाव कायशासकीय योजनांचा लाभ घेतला काय उपजिवेकेची दुसरे साधन आहे काय असे प्रश्न त्यास विचारले. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री आपणास थांबवून आपली आपूलकीने विचारपूस करतातहे पाहून गुरख्याने भितीयुक्त आदराने त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version