Home विदर्भ बाबासाहेबांचा पुतळा विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देत राहील : आ.विजय रहांगडाले

बाबासाहेबांचा पुतळा विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देत राहील : आ.विजय रहांगडाले

0

तिरोडा, दि.16 : अत्यंत विपरित व कठीण परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देश-विदेशात जावून शिक्षण घेतले. देशातून ते सर्वाधिक उच्चविद्याविभूषित ठरले. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. ग्राम चिरेखनी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे हा बाबासाहेबांचा पुतळा विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी केले. महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारंभ ग्राम चिरेखनी येथे नालंदा बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बाबासाहेबांचा पुतळा

मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झाल्याने 14 एप्रिल रोजी आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते, माजी आ.दिलीप बंसोड यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी विशेष मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक योगेश पारधी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिप सदस्य प्रवीण (पवन) पटले, जिप सदस्य किरणकुमार पारधी, जिप सदस्य चत्रभुज बिसेन, जिप सदस्य अॅड.माधुरी रहांगडाले, पंस सदस्य हुपराज जमईवार, पंस सदस्य सुनंदा पटले, मेरिटोरियस पब्लिक स्कूलचे संस्थापक मुकेश अग्रवाल, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, सामाजिक कार्यकर्ते ओम पटले, महाप्रज्ञा बुद्धविहार कमिटी तिरोडाचे अध्यक्ष अतुल गजभिये उपस्थित होते.

याशिवाय गावातील मान्यवर उपसरपंच रंजिता रिनाईत, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पारधी, सुरेन्द्र कोटांगले, नितेश कटरे, संजयकुमार पारधी, हस्तकला पारधी, शिला बिसेन, पौर्णिमा पारधी, सुनीता पटले, ग्रामसेविका संगीता थोटे, पोलीस पाटील यमेश्वरी कुर्वे-फाये, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाईत, तंमुस अध्यक्ष नंदकुमार बिसेन, सामाजिक कार्यकर्ते रमेश टेंभरे, माजी सरपंच जगन्नाथ पारधी, माजी उपसरपंच सोनू पारधी, सामाजिक कार्यकर्ते राजू ठाकरे आदि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आ.दिलीप बंसोड यांनी, समाज उत्थानासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य आणि आता समाजाची दिशा व दशा यावर मार्गदर्शन केले. तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले यांनी बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करण्यास सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी सायबर क्राइम व होणार्‍या फसवणुकीपासून कसे वाचता येईल, यावर मार्गदर्शन केले. ठाणेदार योगेश पारधी यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली. जिप सदस्य प्रवीण पटले यांनी बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी केलेले कार्य सांगितले. तर ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पारधी यांनी गावातील बंधुता व सामाजिक सलोखा याची माहिती दिली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांनी बाबासाहेबांची ग्रंथनिर्मिती व त्याचा समाज विकासासाठी योगदान यावर माहिती दिली. तर अतुल गजभिये यांनी बाबासाहेबांची तीन गुरु, एससी, एसटी व ओबीसी समाजाची दशा व दिशा यावर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष देवानंद शहारे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर ग्राम चिरेखनी येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा चिरेखनी अशी कमिटी गठित करण्यात आली होती. या कमिटीने सन 1962 मध्ये गावात शाळेसमोर बाबासाहेब व भगवान बुद्ध यांचा पुतळा स्थापन केला होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा हेतु त्यामागे होता. कालांतराने तो पुतळा खंडित झाला. त्यामुळे सन 2003 मध्ये तत्कालीन तहसीलदार यांच्या परवानगीने तो पुतळा हटविण्यात आला व ओटा तोडण्यात आला. त्यानंतर कमिटीने 2004 मध्ये भगवान बुद्धांची मूर्ति स्थापन केली व बाबासाहेबांचा पुतळा जुन्या जागेवरच स्थापन करण्याचे नियोजन केले. मात्र समाजबांधवांच्या दुर्लक्षामुळे ते होवू शकले नाही. सन 2021 च्या शेवटी नालंदा बुद्ध विहारची नवीन कमिटी गठित करण्यात आली व या कमिटीने तीन-चार महीने दिवस रात्र परिश्रम घेतले. त्यामुळेच बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा येथे पुन्हा नव्याने स्थापन होवू शकला. आता हा पुतळा समाजबांधवांना, विद्यार्थ्यांना व गावाला प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले.संचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका धम्मदूत राजविलास बोरकर यांनी केले. आभार राजू ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नालंदा बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष मनोज जांभूळकर, उपाध्यक्ष शैलेश धमगाये, सचिव सुभाष जांभूळकर, सहसचिव विरेन्द्र कोटांगले, कोषाध्यक्ष उमेश जांभूळकर, ज्येष्ठ नागरिक वासुदेव शहारे, किशोर कोटांगले, नरेंद्र कोटांगले, शिक्षक शैलेन्द्र कोचे, महेंद्र कोटांगले, विशुपाल जांभूळकर, प्रवीण जांभूळकर, विनोद कोचे, शैलेन्द्र वालदे, किशोर सरोजकर, आशीष शहारे, प्रदीप राऊत, महेश जांभूळकर, राजेश धमगाये, निशाल जांभूळकर, कमलेश जांभूळकर, कुंदन भैसारे, कुणाल शहारे, महिला समितीच्या अध्यक्ष पौर्णिमा शहारे, निशा शहारे, पविता जांभूळकर, भारती भैसारे, पायल कोटांगले, वंदना कोटांगले, मंदा जांभूळकर, उज्ज्वला राऊत, चंद्रकला जांभूळकर, रत्नमाला जांभूळकर, कृपाली सरोजकर, कमला शहारे, स्वानंदा कोटांगले आदि नालंदा बुद्धविहार समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, धम्म उपासक व उपासिका यांनी सहकार्य केले.

प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आमदारांचे आश्वासन

यावेळी बुद्ध विहार व समाज मंदिर यांचे वरचे स्लॅब एकाच पातळीत समतल करून त्यांच्या वर मोठे मेडिटेशन हॉल तयार करण्यात यावे, बुद्ध विहार व समाज मंदिरासमोर सभामंडप तयार करण्यात यावे अशा मागण्या नालंदा बुद्ध विहार कमिटीने केल्या. यावर आमदार विजय रहांगडाले यांनी चर्चेच्या माध्यमातून सदर प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन कमिटीला दिले. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी समाज मंदिरामध्ये अभ्यासिका केंद्र उघडण्यात येईल, त्यात सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतील, असे पुढील नियोजन असल्याचे नालंदा बुद्ध विहार कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

सर्वांचे योगदान व श्रमदानातून पूर्णाकृती बाबासाहेबांचा पुतळा साकार

ग्राम चिरेखनी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकार करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. कुणी गिट्टी तर कुणी लोखंड, कुणी सीमेंट तर कुणी रेती. या दानदात्यांमध्ये जिप सदस्य पवन पटले, ग्रामपंचयात सदस्य घनश्याम पारधी, मेरिटोरियस पब्लिक स्कूल तिरोडाचे संस्थापक मुकेश अग्रवाल, व्यापारी पंकज देहलीवाल, संजय कोटांगले, लंकेश टेंभेकर, मुन्ना रहांगडाले, अंजु रहांगडाले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिम्मत मेश्राम आदि अनेकांचा समावेश आहे. शिवाय गावातील धम्मबांधवांनी प्रती महिना प्रती कुटुंब 200 रुपये वर्गणी त्यासाठी गोळा करण्यात येत होती. बांधकामासाठी लाकडी पाट्यांची व्यवस्था विजय साखरे तर लांब बासांची व्यवस्था सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवचंद रिनाइत यांनी करून दिली. ओटा बांधकाम रोजीची अपेक्षा न करता शैलेश धमगाये, महेश जांभूळकर, प्रवीण जांभूळकर, कुलदीप राऊत व प्रभू शेंडे या मिस्त्री मंडळीने केले. बुद्धविहार व समाज मंदिराची पेंटिंग किशोर सरोजकर व विशुपाल जांभूळकर यांनी केले. गाव भोजनासाठी शंभर किलो तांदळाची व्यवस्था महेश (महेंद्रसिंग) शहारे यांनी करून दिली. त्यात कमिटीच्या सर्व लोकांनी श्रमदान केले. एकंदरीत सर्वांच्या योगदानातून व श्रमदानातून बाबासाहेबांचा सुंदर पूर्णाकृती पुतळा ग्राम चिरेखनी येथे दीपस्तंभाप्रमाणे साकार झाला.

error: Content is protected !!
Exit mobile version