Home विदर्भ महामानवांच्या विचार चिंतनाने चिंता नस्ट होईल-आ.चंद्रिकापुरे

महामानवांच्या विचार चिंतनाने चिंता नस्ट होईल-आ.चंद्रिकापुरे

0

अर्जुनी मोरगाव- मनुष्याने जीवन अधिक कष्टमय केले.वक्त्यांचे विचार ग्रहण करण्याची समता आजच्या पिढीत नाही. महापुरुषांचे विचार डोक्यात उतरविणे पेक्षा डोक्यावर घेऊन नाचण्याची नवीच रित सुरू झाली.आम्ही महापुरुषांचे पुतळे उभारतो मात्र त्यांचे विचार आचरणात आणत नाही.पुतळ्यांची संरक्षण आणि विचारांचे संरक्षण यातील मार्ग समजत नाही.बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग, पंचशीलेचे दैनंदिन जीवनात पालन करतो का?याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.बाबासाहेबांचे विचार जगभर पसरवायचे हा विचार योग्य पण स्वतः बद्दल आत्मचिंतनाची गरज आहे. जाती विरहित विचाराने सामाजिक व्यवस्थेचा विकास होईल.नीतिमान समाज निर्माण होईल.मानव जातीतील चिंता समूळ नष्ट करायची असेल तर महामानवांच्या विचारांचे चिंतन आवश्यक आहे असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
ते शहरातील संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व समता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना संबोधित होते.
यावेळी नगरपंचायत नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे ,सभापती दानेश साखरे ,उपसभापती दिक्षा शहरे ,नगरसेवक सर्वेश भुतडा, एसकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर ,अतुल बनसोड, सागर आरेकर, नगरसेविका शीला उईके ,सपना उपवनसी ,संध्या शाहारे,सुषमा दामले, मंजुषा चंद्रिकापुरे ,माजी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे ,डॉक्टर देवेंद्र घरतकर, डॉक्टर भारत लाडे, लक्ष्मीकांत मडावी ,प्रा.सांगोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाणे झाली.यावेळी
नगरपंचायतच्या सामाजिक विकास योजना अंतर्गत बौद्ध विहार व सभागृहाचे लोकार्पण आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे चंद्रिकापुरे यांनी सात वर्षापासून देशात विषारी वातावरण सुरू आहे. हिंदुराष्ट्राची तळमळ,धर्म संप्रदायाच्या नावाखाली द्वेष पसरविणे सुरू आहे.देशात समान नागरी कायद्याचा विचार सुरू आहे.गत सात वर्षात आरक्षणाचा लाभ बंद झाला. उच्चवर्णीयांचा साम्राज्य विस्तार सुरू आहे.राजकीय घटनांचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे.बाबासाहेबांच्या विचारांनी वैचारिक लढाई लढण्यास सज्ज व्हा असे आवाहन उपस्थितांना केले. यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्पुरुष शहारे.संचालन सु. मो.भैसारे आणि आभार जगझापे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि एकता मंचच्या बौद्ध उपासक-उपासिका यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version