Home विदर्भ सरकार सरकारी उद्योग विकून आरक्षण संपवित आहे – से.नी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील

सरकार सरकारी उद्योग विकून आरक्षण संपवित आहे – से.नी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील

0

भंडारा- जातीधर्माच्या बंधनात न अडकता ओबीसींनी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे मत शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांनी व्यक्त केले. ओबीसी जनगणना परिषदेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी शिक्षक भारतीचे संस्थापक व आमदार कपिल पाटील, सेवानवृत्त न्या.बी.जी.कोळसे पाटील, अध्यक्ष प्रदीप ढोबळे, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, अशोक कापगते, समन्वयक सदानंद इलमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकोबा, श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रार्जशी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. आमदार कपिल पाटील म्हणाले, ओबीसी बांधवांनी जातीधर्माचा विचार न करता ओबीसींना संविधानिक हक्क मिळणे आवश्यक आहे. यासाठी ओबीसी जनगणनेची गरज आहे.
हक्कासाठी ओबीसी जनगणनेचे भोंगे वाजवणे आवश्यक आहे. न्या.बी.जी.कोळसे पाटील म्हणाले, जेव्हा ओबीसी जनगणनेचा प्रश्न येतो, तेव्हा देशात हिंदू-मुसलमान असा संघर्ष उभा केला जाऊन ओबीसींचे लक्ष विचलित केले जाते व ओबीसी जनगणनेपासून ओबीसींना दूर ठेवले जाते. म्हणून ओबीसींनी धर्माच्या राजकारणात पडू नये. इंजि.प्रदीप ढोबळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ओबीसींचे खरे उद्धारक आहेत याची जाणीव ओबीसी समाजबांधवांनी ठेवावी आयोजन ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी सेवा संघ व शिक्षक भारती, शासनमान्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. संचालन जिल्हा समन्वयक संजय आजबले यांनी तर प्रास्ताविक सदानंद इलमे यांनी केले.
आभार गोपाल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.बाळकृष्ण सार्वे, तेजस शेंडे, गोपाल सेलोकर, गोपाल देशमुख, भय्याजी लांबट, के.झेड.शेंडे, वामन गोंधळे, अंजली बांते, अनिता बोरकर, प्रभुजी मने, मंगला वाडीभस्मे, मंगला डहाके, पंकज पडोळे, सुमित पंचबुद्धे, मनोज बोरकर, पांडुरंग फुंडे, उमेश सिंगनजुडे, विनोद किंदर्ले, दिनेश पिकलमुंडे, ईश्‍वर निकोडे, विकास वंजारी, विनोद हटवार, दिनेश साकुरे, लेकराज साखरवाडे, मोरेश्‍वर तिजारे, आनंदराव उरकुडे, गोपाल नाकाडे, पवन साळवे, पंकज जाधव इ.सहकार्य केले.

Exit mobile version