फुले-आंबेडकरांच्या विचारात सामाजिक एकोपा असण्याचे सूत्र-डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे

0
14

 यवतमाळ,दि.18ः भारतीय पिछडा (ओबीसी )संघटन व ओबीसी जन मोर्चाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये असलेल्या पदाधिकार्‍यांच्या वतीने 17 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे उत्हासात आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात सोळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका व्यक्त करीत ओबीसीचे संघटन वाढवत असताना फुले आंबेडकरांच्या विचारांचे सूत्र घेऊन आपण सामाजिक एकोपा जोपासला पाहिजे असे मत अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गोरे यांनी व्यक्त केले.आता आपल्याला गावागावांमध्ये जाऊन ओबीसींना जोडण्याची भूमिका घ्यावी लागेल जातीनिहाय जनगणनेची भूमिका त्यांना समजावून सांगावे लागेल असे मत विलास काळे यांनी व्यक्त केले.प्रा.सविता हजारे यांनी महिलांना फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे लागेल आणि आत्मसन्मानाची चळवळ उभी करावी लागेल असे मत व्यक्त केले.ओबीसी जातीच्या प्रक्रियेतून प्रवर्गाच्या प्रक्रियेमध्ये आपण आता लढलं पाहिजे असे मत विदर्भ अध्यक्ष सुनीता काळे यांनी व्यक्त केले.तसेच झरी वरून आलेले आशिष अशोक साबरे,यांनी संपूर्ण चळवळ केडरबेस पद्धतीने कशी उभी करावी लागेल आणि त्याकरीता आपण सातत्याने प्रयत्न कसे करत राहून ही भूमिका मांडली. कळंब येथील गायत्री नवाळे यांनी महिलां संघटन वाढत असताना फुले-आंबेडकरांच्या विचारातूनच आपण आता पुढे जाऊ शकतो अशी भूमिका मांडली. जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मायाताई गोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माधुरी फेंडर ,नीता दरणे ,अनिता गोरे ,वैशाली फुसे,विद्यार्थी आघाडी प्रमुख अक्षय शेंडे ,ओबीसी कर्मचारी अधिकारी संघटनेचे संजय बारी ,शशिकांत लोळगे, संजय राव चामाटे ,विपिन वडले ,गणेश बुट्टे दीपक वाघ सुषमा बोरकर वासुदेव खेरडे रमेश मोते,समता पर्वचे दीपक नगराळे ,राजू रोहणकर मनोज झोपाटे, ललिता वाघ अर्चना हजारे, कळगावच्या उपसरपंच ज्योती खेडकर ,प्रतिभा गोबरे, प्रवीण गोबरे बंटी गोबरे, विश्वास वालदे, महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ येथील सन्माननीय प्रफुल्ल खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन विनोद इंगळे यांनी केले.