गोंदिया जिल्हा परिषदेच्या कॅपोपदावर खोटरे यांची पदोन्नतीने नियुक्ती

0
107

गोंदिया,दि.21ः-महाराष्ट्र लेखा व वित्त सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील अधिकार्यांना उपसंचालक पदावर वित्त विभागाने तात्पुरती पदोन्नती दिली असून या पदोन्नती आदेशातून गोंदिया जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर जनार्दन हरी खोटरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वित्त विभागाने 59 जणांच्या काढलेल्या पदोन्नती यादीत खोटरे यांचा समावेश आहे.तर ओंकार रामचंद्र अंबपकर यांची नियुक्ती गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.मनोहर नारायण बागडे यांची चंद्रपूर महानगरपालिकेत मुख्य लेखा अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.