Home विदर्भ रेंगेपार जंगलातील वृक्षतोड प्रकरणातील त्या दोषी वनकर्मचा-यांवर कारवाई थंडबस्त्यात

रेंगेपार जंगलातील वृक्षतोड प्रकरणातील त्या दोषी वनकर्मचा-यांवर कारवाई थंडबस्त्यात

0

**गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
*सडक अर्जुनी*:--तालुक्यातील सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले -रेगेंपार (पांढरी) अंतर्गत जियालाल अंबुले यांचे शेतातील सागवान झाडांची विनापरवाना कटाई करून रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होते.दरम्यान वनकर्मचा-यांनी ती लाकडे कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असताना गावकऱ्यांनी पकडले.या प्रकरणातील दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी वनरक्षक, वनमजूर व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
या प्रकरणाची तक्रार उपवनसंरक्षक गोंदिया यांना करण्यात आली असून अजून पर्यंत उप वनविभाग गोंदिया च्या माध्यमातून एएसएफ व डिएफओ यांनी कारवाई केली नसल्याचे बोलले जाते.या प्रकरणात एएसएफ व डिएफओ वनकर्मचा-यांना वाचविण्याचा प्रयत्न करत तर नाही ना ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या प्रकरणाची तक्रार करून सुद्धा दोषी वनकर्मचा-यांवर कारवाई थंडबस्त्यात आहे.
तालुक्यातील सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले- रेंगेपार (पांढरी) अंतर्गत जियालाल अंबुले यांचे शेतातील सागवन झाडांची विनापरवाना कटाई करण्यात आली.शेतालगत असलेल्या कुरण जंगलातील झाडे अवैधरित्या कटाई करण्यात आली.कटाई केलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मी.अंतरावर ठेवण्यात आली होती.बराच कालावधी लोटून सुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नव्हती. १८ मार्च रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास १५ वनकर्मचारी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत असताना गावकऱ्यांनी पकडले.या प्रकरणातील दोषीं वनरक्षक व वनमजूर यांच्यावर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.अशाचप्रकारे अवैध वृक्षतोड प्रकरणात डोंगरगाव डेपो सहवनक्षेत्रातील सतीटोला गावाजवळील क्र. ६६२ मध्ये सागवानच्या झाडांची कत्तल केली.या प्रकरणात वनरक्षक, वनमजूर व ठेकेदारावर कारवाई करण्यात आली.मात्र रेंगेपार (पांढरी) जंगलातील सागवान प्रकरणात वनरक्षक ,वनमजूर व ठेकेदारावर कारवाई अजूनही थंडबस्त्यात आहे.वनरक्षक, वनमजूर व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.जर या प्रकरणात वनविभागाचे अधिकारी कडून वनरक्षक वनमजूर व ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असेल तर रेंगेपार वासीयाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version