Home विदर्भ पाच दिवसीय “युवा महोत्सव” प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाच दिवसीय “युवा महोत्सव” प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

गोंदिया:- संविधान मैत्री संघ कृत सर्व समाज विचार महोत्सव समिती गोंदिया जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फक्त औपचारिक मिरवण्यासाठी म्हणून नाही तर तळागाळात जन सामान्यांपर्यंत महामानवांचे मानवतावादी संदेश पोहोचविण्यासाठी तसेच समाजात संविधान संस्कृति निर्माण व्हावी बंधुभाव वाढावा आणि येणारी पिढी घडावी यासाठी प्रयत्नशील असताना युवक-युवतींना मंच उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंस्फूर्त पाच दिवसीय शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कला कौशल्य, प्रतिभा संवर्धन “युवा जागृती महोत्सव” स्थानिक गुरु नानक शाळा ऑडिटोरियम हॉल, गोंदिया येथे संपन्न झाला. प्रा.डॉ.दिशा गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील सर्वसमाज विचार महोत्सव समितीच्या वतीने महामानवांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून या युवा महोत्सवाची सुरुवात झाली.
पाच दिवसीय युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी युवकांसाठी सामाजिक विषयांवर निःशुल्क प्रवेश असलेल्या स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी डॉ.निशा भुरे व प्रा.डॉ. नीता खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली “महात्मा फुले यांच्या साहित्यावर चर्चा चिंतन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी घडविण्यासाठी धड़पडलेल्या एस एस गर्ल्स कॉलेजच्या पूर्व ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ निशा भूरे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ शीतल भुतेश्‍वर यांच्या युवक बिरादरी संघटनेतर्फे सामाजिक विषयांवर काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मनमीत अरोरा, डॉ. मनोज राउत उपस्थित होते. तदनंतर बाहेकर व्यसनमुक्ती केंद्रातर्फे “व्यसनमुक्त भारत” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. याच दिवशी “मेरा वोट बिकाऊ नही” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला. ‘मेरा वोट बिकाऊ नहीं’ कार्यक्रमात जेसीआयचे पुरुषोत्तम मोदी, दिनेश गेडाम, नीळकंठ चिचाम हे मार्गदर्शन करत होते. तिसऱ्या दिवशी “युवा व महिलांसाठी आर्थिक सबलीकरण” मार्गदर्शन कार्यक्रम आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटर आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना विभागाकडून घेण्यात आला. कार्यक्रमाला वन स्टॉप क्रायसिस सेंटर प्रमुख गुलशनी केरकट्टा, एकात्मिक महिला बाल विकास योजना विस्तार अधिकारी तीर्थराज उके, राष्ट्रीय क्रीड़ा प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी किरण वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली हस्तकला प्रदर्शनी तसेच गायत्री कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती व्यवसाय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. चौथ्या दिवशी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांच्या नेतृत्वाखाली व एमजी पॅरामेडिकल कॉलेज प्रशासन व साहित्यिक अंजना श्रीराम खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यविषयक “रक्त तपासणी शिबिर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या पाचव्या दिवशी समता सैनिक दलाच्या नेतृत्वात महामानवांचे मानवतावादी संदेश देणाऱ्या झांकी सह सर्वसमाजातर्फे “विश्व शांति रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रैलित सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक अंजना श्रीराम खुणे, सहयोग समूहाचे चेयरमैन जयेश रामादे, समाजसेविका सविता बेदरकर, भ.वि. जमाती संघटनेचे अनिल मेश्राम, दीपक घरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
“युवा महोत्सव” कार्यक्रमात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात पर्यावरण-आरोग्य संरक्षण या विषयावर आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला गटातून अश्विनी ऋषी गेडाम, विद्यार्थी गटातून प्रिया नागपुरे (प्रथम), श्रेया मेश्राम (द्वितीय), सलोनी नेवारे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “व्यसनमुक्त भारत” या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत देवेंद्र घरत (प्रथम), अंजली ठाकरे (द्वितीय), साक्षी भेलावे (तृतीय), तर शालेय विद्यार्थ्यासाठी “शिक्षा का महत्व” या विषयांवर आयोजित चित्रकला स्पर्धेत रिया आसोले (प्रथम), प्रयास बनसोड (द्वितीय), पूजा. सोनवणे (तृतीय), “जीवनात शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर आधारित निबंध स्पर्धेत पूनम शेंडे (प्रथम), भारती नरेश मेश्राम (द्वितीय), धनराज नेवारे – अंजोरा (तृतीय), व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित “गोंदिया गरिमा” स्पर्धेत नेहा पेंढारकर (विजेती), गार्गी चंद्रिकापुरे (प्रथम उपविजेती). माधुरी भोयर (द्वितीय उपविजेती), पारंपारिक फॅन्सी ड्रेस स्पर्धेत जया वाहाणे (प्रथम), रूपम मेश्राम (द्वितीय), जीवा बनसोड (तृतीय), पारंपारिक नृत्य स्पर्धेत कनिष्ठ गटातून प्रवश्री कळमकर (प्रथम), भूमी राऊत- झरिना वाढई (द्वितीय), भाग्यश्री बघेले (तृतीय), वरिष्ठ गटातुन चित्रकला कुमार (प्रथम), श्रेया रेलकर (द्वितीय), सिया एडपाचे, प्रतीक्षा कोल्हटकर, अलिशा चौहान (तृतीय) सामाजिक विषयावर आधारित नाटक “कन्यााधिकार” मधील सहभागी अश्विनी वाढवे, रक्षा लांजेवार, हिना लांजेवार, माधुरी भोयर, कविता वाचन स्पर्धेत कनिष्ठ गटातून पारुल माचेवार (प्रथम), सुरभी आगाशे (द्वितीय), हिना लांजेवार (तृतीय), वरिष्ठ गटातून शालू कृपाळे (प्रथम), रश्मी अग्रवाल (द्वितीय), भारती किरणापुरे लीना साठवणे, महेश लांजेवार (तृतीय), “मेरा वोट बिकाऊ नही या विषयावर घेण्यात आलेल्या वकतृत्व स्पर्धेत सुहानी पात्रे (प्रथम), अलिशा चौहान (द्वितीय), विद्या रहांगडाले (तृतीय), “टकाऊ पासून टिकाऊ” स्पर्धेत आकृती मेश्राम (प्रथम), उज्वला शहारे (द्वितीय), पराग लांजेवार (तृतीय) यांना स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारे हिमांशू भालाधरे, अश्विनी बघेले, आकांक्षा शेंद्रे, दिव्या सोनवणे, साक्षी इंगोले, अनुभव सतदेवे, आयुष्य बनसोड, रेश्मा शेख, रोपेश राऊत, वर्षा बघेल, रजनी गभणे, पायल सोनवणे, पल्लवी खोब्रागडे, मनीषा राऊत, राखी वरकडे, सन्मती माने, सिद्धी ढोरे, हर्ष वाधवानी यांची प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेत परिक्षकांच्या भूमिकेत साहित्यिक माणिक गेडाम, सीपी बिसेन, वसंत गवळी आणि बोपचे ताई, माधुरी भेलावे, शिल्पा चौहान, जेसीआयच्या मंजू कटरे, अवी नागपुरे, शिखा पिपलेवार आदि होते
प्रसंगी स्वागत गीत मनिषा निनावे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन महिला वर्गातुन शालू कृपाळे, भारती किरणापुरे, पुरुष वर्गातून दिलीप कोसरे व विद्यार्थि वर्गातुन प्रांजल सोनवणे, रश्मी येसेनसुरे यांनी केले. आभार प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वसमाज विचार महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. दिशा गेडाम, कार्याध्यक्षा गुलशनी केरकट्टा, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, आदेश गणवीर, पंचशीला पानतावणे, वनिता चिचाम, अरुण बन्नाटे आदींनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!
Exit mobile version