देवरी येथे खरीप हंगाम पूर्व आढावा सभा

0
70

शासनाच्या कृषि योजनेचे प्रचार प्रसार करण्याचे आमदार कोरोटे यांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश
देवरी, ता. २३ :देवरी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाचे खरीप हंगाम पूर्व आढावा सभा देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (ता.२२ एप्रिल) रोजी पार पडले.
या सभेत देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व कृषी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, या उदेशाने कृषी विभागाच्या योजनेचे प्रचार -प्रसार व प्रसिद्धी चांगल्या प्रकारे करण्याचे निर्देश आमदार कोरोटे यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी देवरी तालुका कांग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया, देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, तहसीलदार अनिल पवार, तालुका कृषी अधिकारी घनश्याम तोडसाम, नगरसेवक शकील कुरैशी यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषि सहाय्यक व इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.