Home विदर्भ जेठभावड़ा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांचा सर्वांगीण विकास होणार

जेठभावड़ा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांचा सर्वांगीण विकास होणार

0

जेठभावड़ा येथे व्यैक्तीक आणी सार्वजनिक विकास कार्याचा दहा वर्षीय सुक्ष्मनियोजन कार्यक्रम

देवरी, ता.२६:शासनाच्या संकल्पेनुसार मग्रारोहयोच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला योजनेचे लाभ मिळण्यासह या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्यास मी कटिबध्य आहे. जेठभावड़ा ग्रामपंचायती अंतर्गत सर्व वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्राचा विकास व्हावा, याकरीता मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.

ते देवरी तालुक्यातील जेठभावडा येथे सोमवारी (ता.२५) ग्रामपंचायतीद्वारे आयोजीत सुक्ष्म नियोजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भर्रेगांव क्षेत्राचे जि.प सदस्य संदीप भाटीया,पं.स सदस्य अंबिका बंजार,प्रल्हाद सलामे,जिल्हा कांग्रेस  महासचिव बळीराम कोटवार,जेठभावडाचे सरपंच श्री दुधनांग,उपसरपंच शालिनीताई देशाई,तटांमुक्ति समितीचे अध्यक्ष युवराज प्रधान,माज़ी सरपंच डॉ. जितेन्द्र राहांगडाले, पोलिस पाटील,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी गौतम, साखरे यांच्यासह कृषी विभाग ,वनविभाग व अन्य शासकीय यंत्रनेचे सर्व अधिकारी ,कर्मचारी व गावकरी आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना आमदार कोरोटे म्हणाले की, या क्षेत्राच्या विकासाकरिता सर्व संबधित विभाग आणि शासकीय यंत्रनेद्वारे संयुक्त रुपात सूक्ष्म नियोजन करून या क्षेत्रात सर्व कामे सुरु होणार आहेत. ही प्रकिया सतत तीन दिवसापर्यंत सुरु राहणार आहे.या प्रकियेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंतच्या सर्व सर्वेक्षण करुण या कार्याची सुरुवात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version