आरोग्यवर्धिनी केंद्र बाराभाटी व कुंभीटोला येथे आरोग्यवर्धिनी वर्धापन दिन साजरा

0
29

अर्जुनी मोरगाव,दि.29ः  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिननिमित्त तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धनी कार्यक्रमाला चार वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्यवर्धिनी केंद्र सर्व जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत साजरा करण्याचे सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुशंगाने  प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र बाराभाटी व कुंभीटोला येथे आरोग्यवर्धिनी दिवस  आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्या सौ.शालिनी डोंगरवार व कुंभीटोला गावचे प्रथम नागरिक सरपंच युवराज आरसोरे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे व बाराभाटी आयुर्वेदिक दवाखान्याची वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबर मडावी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बाराभाटी आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.गौरव टेंभेकर, कुंभीटोला आरोग्य वर्धनी केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.तृप्ती गहाणे व प्रतापगड आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रिया चव्हाण यांनी पार पाडली. त्यांनी गावातील लोकांना आजच्या दिवशी सुरू होत असलेली घरबसल्या ओपीडी सेवा संजीवनी टॅलीकन्सल्टंटचे महत्व मार्गदर्शन करून दिले. शिवाय आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आयुष्यमान भारत योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा यांचे महत्व त्यांना समजावून सांगितले. टेलीकन्सल्टेशन द्वारे दिवसभर ओपीडी सेवा दिली त्यासाठी डॉक्टर जयस्वाल वैद्यकीय अधिकारी गोठणगाव यांनी मोलाची मदत दिली.
डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी लोकांना योगा, आसने, व मेडिटेशन चे महत्त्व समजावून सांगितले शिवाय योगशिक्षक शोभा ठाकूर यांनी योगाचे विविध प्रात्यक्षिक द्वारे आसनांची माहिती समजावून सांगितली. सदर कार्यक्रमात दोन्ही उपकेंद्राचे आरोग्यसेविका कु.व्हि.जी.साखरे, कु.वाय.एम. मानापुरे, कु.एम.आर.रहांगडाले तसेच परिचर श्रीमती.कांबळे ,आशा सेविका, आरोग्य सेवक आर.एस.वघारे, ए.आर.कांबळे यांची सुदधा उपस्थिती होती.