Home विदर्भ नैसर्गिक आपत्ती कक्षाकडून इंसीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचे प्रशिक्षण 

नैसर्गिक आपत्ती कक्षाकडून इंसीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचे प्रशिक्षण 

0
वाशिम दि २९ – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्षाच्या वतीने आज २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी श्री हिंगे यांच्या मार्गदर्शनात इंसिडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून श्री.भगत यांनी मान्सून काळात आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तात्काळ मदत मिळणे, आपत्तीच्या घटनांबाबत तात्काळ संबंधित विभागांशी समन्वय साधणे अत्यंत आवश्यक असते. अशा प्रसंगी संबंधित विभाग प्रमुख तसेच कार्यवाही करणारी यंत्रणा यांना दिशानिर्देश देण्यासाठी संपर्क क्रमांकाची अत्यंत आवश्यकता असते. आपत्तीच्या वेळी आपदग्रस्तांना तात्काळ मदत व संसाधने उपलब्ध झाली पाहिजे यासाठी शासनाने मदतीचा वेळी तात्काळ जिल्ह्यातील किंवा आपले सभोवत असणाऱ्या संसाधनाची माहिती मिळावी यासाठी यांची इंसिडन्स रिस्पॉन्स सिस्टीम अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्री भगत यांनी यावेळी दिली.
            प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्षाचे रवी अंभोरे,विनोद मारवाडी, नागोराव खोंड, मोहन माहोरकर, सागर बदामकर व किरण सोळंके यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version