Home विदर्भ गुलामगिरी` ग्रंथावरील परीक्षेत तरन्नुम अन्सारी प्रथम   

गुलामगिरी` ग्रंथावरील परीक्षेत तरन्नुम अन्सारी प्रथम   

0
नागपूर, – राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले लिखित `गुलामगिरी` ग्रंथावरील परीक्षेच्या विजेत्यांची घोषणा आज करण्यात आली. व  बक्षीस वितरण करण्यात आले
प्रबोधनात्मक ग्रंथ वाचून बुरसटलेल्या विचारसरणीचा त्याग करावा व मानसिक परिवर्तन व्हावें या उद्दात हेतूने या ऐतिहासिक व अनोख्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील यशवंत स्टे़डियममध्ये तब्बल एक हजाराहून जास्त सर्वधर्मीय महिला, पुरूष, युवक, युवती या परीक्षेला बसले होते,महाराष्ट्रातून परीक्षेसाठी परीक्षार्थी आले होते. विशेष म्हणजे आयोजकांकडून सर्व परीक्षार्थ्यांना `गुलामगिरी` ग्रंथही देण्यात आला होता. कोरोना लाटेमुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते.
प्रथम पुरस्कार तरन्नुम अन्सारी(    10000         ), व्दितीय पुरस्कार प्राची रवी पाटील (  7000         ), तृतीय पुरस्कार रश्मी अरुण कावरे (   5000             ) यांना जाहीर झाला आहे. उत्तेजनार्थ विजेते म्हणून प्रमिला वामनराव काळबांडे (नागपूर), देवेंद्र पंजाबराव खांडेकर (मोर्शी, जि. अमरावती), प्रतिज्ञा अशोकराव ओंकार (सावंगी मेघे, वर्धा), उमेश प्रल्हाधराव बनकर (सडकअर्जुनी, जि. गोंदिया), मधुकर मोतिरामजी मोहुर्ले ( गिरगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यांची निवड झाली आहे. रोख बक्षीस, सन्मानचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले   डॉ.. रेखा बारहाते  यांनी प्रास्ताविक केले  संचालन ऍड समीक्षा गणेशे आणि आभार डाॅ. भारती सरायकर यांनी केले
बक्षिसाचे वितरण शनिवारी (30 एप्रिल) सीताबर्डी, मोरभवन, नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या  `अर्पण` सभागृहामध्ये करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महिला महासंघाच्या अध्यक्षा इंजिनिअर सुषमा भड, आदी मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी विचार मांडले. ज्येष्ठ विचारवंत आणि सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी, तसेच अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्षा डाॅ. स्मिता मेहत्रे `गुलामगिरी` ग्रंथावर प्रबोधन करण्यासाठी वक्ते म्हणून उपस्थित होते. परीक्षेच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे ज्येष्ठ विचारवंत डाॅ. वासुदेव डहाके आणि  व  डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पत संस्था चे पदाधिकारी श्री.फुके साहेब ,श्री गावंडे साहेब, बहुउद्देशीय तिरले  कुणबी संघाचे अध्यक्ष श्री केदार साहेब,ठवरे साहेब,सुरेश दादा गुढद्ये पाटील   या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शरद वानखडे, सुभाष घाटे,  राजू चौधरी,  वृंदा  ताई ठाकरे, कल्पना मानकर, अर्चना बरडे, नंदा देशमुख, अनिता ठेंगरे,   विजया धोटे, मंदा बोबडे, देवयानी भगत,  वृषभ राऊत, रोशन कुंभलकर, शुभम वाघमारे, रमेश पिसे व राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे पदाधिकारी उपस्थित होते  व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version