सेजगाव सेवा सहकारी संस्थेवर भाजप-राकाँची सत्ता

0
59

एकोडी : जवळील सेजगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत संचालकांची बिनविरोध निवडणूक पार पडली. दरम्यान आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये नविन समीकरण तयार झाले असून भाजपकडे अध्यक्ष तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष देण्यात आले. अध्यक्षपदी बंसीलाल पारधी तर उपाध्यक्ष डॉ.किशोर पारधी यांची निवड झाली.
विविध सेवा सहकारी संस्था सेजगांवच्या निवडणुकीत संचालकांची बिनविरोध निवडणूक पार पडली. दरम्यान आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. संस्थेचे राकॉ-भाजपने समीकरण जुळवून सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान अध्यक्षपदी भाजपचे बंशीलाल पारधी व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे डॉ.किशोर पारधी याची निवड करण्यात आली आहे. या निवडीला सरपंच के.के. पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, एस.डी.पारधी, ज्योती शरणागत, गौरी पारधी, रामचंद्र पारधी, नेतलाल मालाधारी, श्यामराव गायधने, भाऊलाल टेंभरे, गोटे, डॉ.बंसत भगत, मिनेश्वरी पारधी, टि.एल.पारधी, के.बी.सोनेवाने, डॉ.चुन्नीलाल भगत, चंदुलाल बिसेन, फुलचंद पारधी, ज्ञानेश्वर पटले, शिशुपाल पारधी, खेमचंद राऊत, रयनबाई रहांगडाले, डॉ.त्रिलोक पारधी, सचिव कनपटे, निवडणुक अधिकारी नागपूरे यांनी सहकार्य केले. सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचे गावकर्‍यांनी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे , भाजप-राकाँच्या युतीने तालुक्यातील राजकीय वर्तुळात झाल्याने भविष्यात असेच प्रयोग होत राहतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे.