मोर्शी शहरातील विविध विकासकामांसाठी ३७ कोटी ८० लक्ष रुपये मंजूर !

0
22
  • मोर्शी : मोर्शी शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मोर्शी शहरातील रस्ते विकास करण्यासाठी ३७ कोटी ८० लाख कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, शहरातील रस्त्यांचा कामांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आमदार देवेंद्र भुयार यांनी पूर्ण केला आहे.
    मोर्शी शहराच्या विकासाकरिता या आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून मोर्शी शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम नगर परिषदेने पूर्ण केले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मोर्शी शहरातील प्रत्येक रस्ता दर्जेदार व्हावा, केवळ रस्तेच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकासात्मक कायापालट करणार  असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.
    मोर्शी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील अमरावती अप्रोच रोड येरला पांदण रस्ता ओम साई लेआऊट पर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे करिता १२ कोटी २६ लक्ष १० हजार १०९ रुपये,  प्रभाग क्रमांक ४ मधील पंचायत समिती ते मेडिकल चौकपर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे करीता ६ कोटी ८६ लक्ष ६ हजार ४७६ रुपये,
    प्रभाग क्रमांक ९ मधील अमरावती अप्रोच रोड सुधाकर माकोडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे करीता ४ कोटी ५२ लक्ष ५४ हजार १२० रुपये, प्रभाग क्रमांक ६ मधील इलेक्ट्रिक डीपी ते काकापुरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे करीता ४ कोटी ६५ लक्ष ८ हजार ७४० रुपये,  प्रभाग क्रमांक १ मधील सोनकुले ते मो जाकीर यांच्याघरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे व दोन्ही बाजूस गटारीचे काम करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे करीता ५ कोटी ८८ लक्ष ६९ हजार ७६९ रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या सर्व विकासकामांना सुरुवात होणार आहे.
    मोर्शी शहरात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष पुढाकाराने कोट्यावधी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नगरोत्थान महा अभियान अंतर्गत शहरातील उर्वरित महत्वाच्या कामांसाठी ३७ कोटी ८० लाख रुपयांच्या रस्ते प्रकल्पास नगर विकास विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली, असून या बाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
    शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट यानिमित्ताने होणार असून, ही कामे लवकरच पूर्णत्वास जाणार असून उर्वरित विकासकामांसाठी विविध योजनांचा माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे असे म्हणत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामास मोठ्या माणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांसह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

    मोर्शी शहरातील रस्त्यांसह विविध समस्यांची परिस्थिती लक्षात घेता मोर्शी शहरातील  विविध विकासकामांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी अनेक वेळा बैठका घेऊन केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ३८ कोटी ८० लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच मोर्शी शहरातील विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे ——  आमदार देवेंद्र भुयार .