वाघाच्या बंदोबस्तासाठी ताडोबातील शार्प शूटर वडसा वन विभागात दाखल

0
48

गडचिरोली-वडसा देसाईगंज तालुक्यात दशहत निर्माण करणाऱ्या सीटी- १ वाघाला पकडण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शार्प शूटरची टीम ६ मे रोजी वडसा वन विभागात दाखल झाली आहे. या पथकासह वन विभागाच्या पथकाद्वारे वाघाला पकडण्यासाठी युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू केली आहे.

डॉ.रविकिरण खोब्रागडे या भूलतज्ञासह शार्प शूटर अजय मराठे व अन्य पाच जणांचा टीममध्ये समावेश आहे. २८ एप्रिलपासून नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्व्हमधील एक टीम वडसा वन विभागात आली होती. मात्र गुरुवारी अचानक टीमला परत पाठवले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या टीमला पाचारण केले.