ओबीसी आरक्षणाचे बाबतीत सर्वच पक्ष उदासीन ओबीसी सामाजिक संघटनेचे चिंतन

0
17

यवतमाळ,दि.07ः- भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराला तिलांजली देण्याचे काम भारतातील सर्वच राजकीय पक्ष करत आहेत.काँग्रेस ,बीजेपी ,सेना राष्ट्रवादी इतरही राजकीय पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय उदासीन झालेले आहेत.ओबीसीची जातिनिहाय जनगणना हा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ची जर जनगणना होत असेल तर ओबीसीची का नाही ?न्यायालयाचा धाक दाखवून शासन ओबीसी च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, अशी भूमिका राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रेस्ट हाऊस यवतमाळमधील बैठकीमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यामध्ये ओबीसी जनमोर्चाचे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन, विलास काळे ,एडवोकेट संजू गभणे, सुनिता काळे, संजय शिंदे उत्तम गुल्हाने ,यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला अशोक मोहुर्ले ,मायाताई गोबरे ,माधवी लोळगे ,सुषमा पाटील , टी.टी.जाधव संतोष झेंडे ,विठ्ठल नागतोडे ,एडवोकेट मनिष माहुलकर ,ओबीसी नेते अमन निर्माण ,रमेश नाखले, धनंजय फुलकर ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बारी ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शशिकांत फेंडर ,प्रसिद्धी प्रमुख संतोष डोमाळे ,बाळासाहेब शिंदे संजय राजगुरे. खेरडे साहेब अब्दुल फारुख.उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शशिकांत लोळगे यांनी मानले.