रजेगाव सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी तिलकचंद पटले

0
35

गोंदिया,26 मेः गोंदिया तालुकातर्गंत येत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था रजेगांवच्या अध्यक्षपदी चाबी संघटनेचे तिलकचन्द पटले तर उपाध्यक्षपदी हिवराज लिल्हारे बिनविरोध निवडून आले.ही निवडणु आज 26 मे रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली.संस्थेच्या निवडणुकीत चाबी संघटनेच्या एकता किसान पॅनलने 12 पैकी 12 जागेवर विजय मिळविला होता.त्यामध्ये तिलकचन्द पटले, हिवराज लिल्हारे,लालचंद पाटिल,चैतराम बिसेन,हेमराज बोरकर, श्रीराम कटरे, कुवरलाल टेभंरे,गणेशलाल बिसेन,कांताबाई रहांगडाले,प्रमिला रहांगडाले,लेखराम टेभंरे व रवि डहाट यांचा समावेश होता. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व संचालकासह मतदारांचे आभार मानले.