जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा सत्कार समारंभ

0
23

गोंदिया,दि.29ः विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटना व विदर्भ मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडालेजी व शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष मिलिंद मेश्राम, प्रांतिय उपाध्यक्ष आंनद जाभुंळकर,सरचिटणीस डि बी लांजेवार,चंद्रशेखर पंचभाई प्रांतिय सचिव,यु.वाय टेंभरे प्रांतिय कोषाध्यक्ष,सुहास जनबंधु प्रांतिय संयोजक,वाय.पी मेश्राम, विदर्भ मागासवर्गीय शिक्षक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष सुरेन्द्र जगने, जिल्हा सरचिटणीस अशोक मेश्राम, कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष विनोद जांभुळकर, मार्गदर्शक डि.डि.शहारे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचारी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली त्यावेळी अध्यक्ष रहागंडाले व शिक्षणाधिकारी शेख यांनी सर्व समास्याचे निराकरण करण्यात येतील असे आश्वासन दिले.