गोरेगांव,दि.05:-यावर्षी जागतिक पर्यावरण दिवस- 2022 या वर्षाची संकल्पना बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयी असून या संकल्पनेला घेत मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.ग्राम पंचायत मुंडीपार येथे आज 5 जून पर्यावरण दिनानिमित्ताने जि.प सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते ग्राम पंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे, माजी तंमुस अध्यक्ष घनश्याम बिसेन,ग्राम पंचायत सदस्य दिनेश दिक्षीत,ग्राम पंचायत सदस्य छंदीप ठाकुर,वन व्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन,रोहित पांडे,सुनिल वाघाडे, खुमराज शिवणकर,अजय नेवारे,बबलू भोंडे,योगेश गमधरे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी वृक्षारोपण
चंद्रपूर ५ जुन – जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ५ जुन रोजी वृक्षारोपण करण्यात आले. बाबुपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम येथे महानगरपालिका उद्यान विभागातर्फे विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार,अक्षय वडपल्लीवार, संदीप रायपुरे, योगेश पेटले, गितेश मुसनवार यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी या रोपट्यांची लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.