पर्यावरण दिनानिमित्त कराटेपटूना दिले पर्यावरणाचे धडे

0
7
चंद्रपूर: रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्युबली हायस्कूल येथे मार्शल आर्ट अँड स्कूल गेम्स असोसिएशनच्या खेळाडूंची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाचे उद्देश चित्रा द्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जास्तीत जास्त जागरुकता पसरविणे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जुबली हायस्कूल च्या प्राचार्या सौ.वाघमारे मॅडम, प्रमुख अतिथी मार्शल आर्ट व स्कूल गेम असोसिएशनचे मास्टर विनोद पुणेकर, तेजस्विनी बैरम, रक्षण धरणी मातेचे फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कोटकर व उपाध्यक्ष अविनाश लेंनगुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचा विषय “प्लास्टिक टाळा निसर्ग वाचवा” हा देण्यात आला होता. बऱ्याच विद्यार्थ्याने या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने भाग घेतले. दहा वर्षा आतील चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस स्वरणीक पारोजी, दुसरे बक्षीस रूनल पंडित, तिसरे बक्षीस अंजली काजेवाड.
तसेच दहा वर्षावरील स्पर्धकांमध्ये प्रथम बक्षीस सौजन्या ईरबत्तनवार, द्वितीय बक्षीस वैष्णवी झोडे, व तृतीय बक्षीस शीतल मेश्राम हिला मिळाले. कार्यक्रमाचे संचालन तृप्ती गौरकार व आभार प्रदर्शन राहुल कोटकर यांनी केले.
संस्थेचे पदाधिकारी रश्मी कोटकर, तृप्ती गौरकार, गौरव वरारकर, नंदकिशोर बल्लारवार, हरप्रीत सिंग, विशाल पेंदोर, ज्योत्स्ना गौरकार, श्रेयस शेंडे, सुरज हजारे, मोना भगत, विभांशू जिवतोडे,मयूर उरीते, हर्ष पेंदोर उपस्थित होते.