मुंडीपार ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ध्वजारोहण

0
18

गोरेगांव,दि.06:- तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथील कार्यालयात आज 06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सर्वांनाच ज्ञात आहे. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय.या खास दिवसाचं औचित्य साधत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 349 वा राज्याभिषेक सोहळा (आज) सोमवारी सरपंच सुमेंद्र धमगाये यांच्या हस्ते ध्वजपुजन करुन ध्वजारोहण करण्यात आले.
उपसरपंच जावेद (राजाभाई)खान, सचिव अरविंद के.साखरे,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,वनव्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत, ग्रा.पं.सदस्य चंद्रगुप्त धमगाये, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन,केशोराव राहांगडाले, लिपीक सुनिल वाघाडे, परिचर अजय नेवारे,योगेश गमधरे व गावकरी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.