मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बांधकामातील गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांना तक्रार

0
39

तिरोडा,दि.07ः- तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता बांधकामाला सुरवात करण्यात आली आहे.सदर रस्ता मुंडीकोटा- भोम्बोडी ते चांदोरी असा असून या मार्गाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कंत्राटदार शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कपील भोंडेकर यांनी मुख्यमंत्री यांना केेलेल्या तक्रारीत केला आहे.सदर रस्ता बांधकामामध्ये सुमारे 88 लाख रुपयाचा गैरव्यवहार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता हे कंत्राटदार व अभियंत्यासोबत मिळून करीत असल्याचा उल्लेख केला आहे.