गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांमधील आरक्षण जाहीर

0
35

गोंदिया, तिरोडा, आमगाव नगर परिषद तसेच गोरेगाव नगरपंचायतीचा समावेश
गोंदिया, ता. १३- जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव नगर परिषद तसेच गोरेगाव नगरपंचायत येथील सदस्यपदांची आरक्षण सोडत सोमवारी (ता. १३) काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनुसार, ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण तयार झाले आहे. एकंदरीत प्रशासक राज असलेल्या नगर परिषदांना आता येत्या काही दिवसांत नगराध्यक्ष व सदस्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोंदिया– येथील नगर परिषदेत प्रभाग क्रमांक एक- सर्वसाधारण महिला+सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक दोन- एसटी महिला +सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक तीन- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक चार- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक पाच- सर्वसाधारण महिला+सर्वसाधारण
, प्रभाग क्रमांक सहा- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक सात -सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण महिला+सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक नऊ- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १०- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक ११- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १२- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १३- एससी महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १४- एससी सर्वसाधारण+ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक १५- एससी महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक १६- एससी सर्वसाधारण+ सर्वसाधारण महिला
, प्रभाग क्रमांक १७- एससी सर्वसाधारण+ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक १८- एससी सर्वसाधारण+ सर्वसाधारण महिला
, प्रभाग क्रमांक १९- एससी महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक २० एससी महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक २१- सर्वसाधारण महिला+ सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक २२- एससी महिला+सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच बालकांच्या हस्ते काढण्यात आली.

आमगाव- येथील नगर परिषदेत प्रभाग क्रमांक एक अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन अ)- सर्वसाधारण महिला, ब)सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाच अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ अ)- अनुसूचित जाती महिला, ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ अ)- अनुसूचित जाती महिला, ब)- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १०अ)- अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११अ)- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला अशी आरक्षण सोडत काढण्यात आली. देवरीचे उपविभागीय अधिकारी अमोल सागर, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांच्या हस्ते आरक्षण काढण्यात आले.

तिरोडा- येथील नगर परिषदेत प्रभाग क्रमांक एक अ)-अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन अ)- अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अ) -सर्वसाधारण महिला, ब) अनुसूचित जाती,

प्रभाग क्रमांक चार अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाच अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ अ)- सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक नऊ अ)- सर्वसाधारण महिला, ब) अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक १०- अ) सर्वसाधारण महिला, ब) अनुसूचित जमाती अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती महिलांसाठी दोन जागा, अनुसूचित जाती पुरुषांसाठी दोन जागा, अनुसूचित जमातीसाठी एक जागा, सर्वसाधारण महिलांसाठी आठ जागा व सर्वसाधारणसाठी एकूण सात जागा जाहीर झाल्या आहेत. ही आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली.
एकंदरीत आरक्षण सोडतीनंतर काही इच्छुकांना फटका तर, काहींना निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उमेदवार चाचपणीच्या कामालाही लवकरच वेग येणार आहे.

गोरेगाव नगरपंचायतीत असे आहे चित्र

गोरेगाव येथील नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या १७ प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभाग क्रमांक एक- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक दोन- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक चार- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक पाच- अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक सहा- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक आठ- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक नऊ- अनुसूचित जमाती जनरल, प्रभाग क्रमांक १०- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १२- अनुसूचित जाती जनरल, प्रभाग क्रमांक १३- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १४- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५- अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक १६- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १७ सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.