एक्युट पब्लीक स्कुल,एस.एस.काॅलेजमध्ये योग दिवस उत्साहात

0
16

एक्युट पब्लिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

गोंदिया- योग म्हणजे साधना, योग आपली भारतीय संस्कृतीची प्राचीनतम ओळख आहे. संसारमधील प्रथम पुस्तक‘ऋग्वेद’मध्ये यौगिक क्रिये विषयीचा उल्लेख केला गेला आहे.योग म्हणजे मनाची शांतता होय. योगधर्म, आस्था आणि  अंधविश्वास पासून दूर असणारा एक सरळ विज्ञान होय. जीवन जगण्याची एक कला आहे. योग आपल्या देशातील ऋषींची परंपरा आज संपूर्ण विश्व साजरा करीत आहे. २१ जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठा दिवस असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.आज एक्युट पब्लिक शाळेत आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीमती गीताताई भास्कर,सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव श्रीमती शुभाताई शहारे तसेच शाळेचे प्राचार्य अमितकुमार,मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला,पर्यवेक्षक प्रविणकुमार,शिक्षक कु.ललिता,अनिता ,श्रीमती विनू,कु.रागिणी,कु.विद्या,कु.खुशबू, कु.ज्योती व शिक्षकेत्तर अश्विनी उपस्थित होते.

शिवप्रसाद सदानंद महाविद्यालयात योग दिवस                                                                                 अर्जुनी/ मोर.दि.21ःआठवा विश्व योग दिवस शिवप्रसाद सदानंद महाविद्यालय अर्जुनी/ मोर. येथे यौगिक क्रिया करून साजरा करण्यात आला.महाविद्यालय परिसरात पार पडलेल्या कार्येक्रमात योग शिक्षक कांतिकुमार बोरकर यांनी योग आणि आपन , साक्षी वृति साधना , आहार यावर प्रकाश टाकून आयुष मंत्रालय द्वारे निर्धारित प्रोटोकॉल नुसार सर्व साधक , प्रधापक व कर्मचारी वृन्द तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यां कडून योगाभ्यास करवून घेतला.
यावेळी दिशा नाकाडे, गुंजन कापगते, यांनी विशिष्ट आसने करून दखविली.सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी डॉ. प्रदीप भानसे यांनी प्रस्ताविक केले.माधुरी पिलारे यांनी संकल्प करवून घेतला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ईश्वर मोहूर्ले हे प्रामुख्याने उपस्थि होते.कार्येक्रमाच्या यशश्वीत्तेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्येक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दर्वे यांच्या नेतृवात बादल गणवीर, ईन्दू शेंडे, मेघा जामभूलकर, शालिनी गेडाम यांनी परिश्रम घेतले.