रायपूर येथे राष्ट्रीय पोषण अभियान मेळावा संपन्न

0
20

गोंदिया,दि.28- :- राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना , प्रकल्प – गोंदिया 01 अंतर्गत रायपूर (बलमाटोला) येथे जि.प.हिंदी प्राथ. शाळा परिसरात दासगांव बिटस्तरीय पोषण अभियान मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. मेळाव्यात पोषण अभियानाशी संबंधित पोषक आहार प्रदर्शनी , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सोबत पोषण अभियानाशी संबंधित पोषण गीत ही सेविकांकडून यावेळी सादर करण्यात आले. यावेळी एकाच वेळी तिळे (तीन अपत्य) जन्माला येणाऱ्या कमी वजनाच्या नातवांची योग्य आहार व आरोग्यविषयक काळजी घेऊन त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणणार्या व सर्व मातांना आदर्श ठरणाऱ्या रायपूरच्या जायत्राबाई पाचे यांचे उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या पोषण अभियान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत रायपूरचे माजी सरपंच जायत्राबाई पाचे होते. मेळाव्याचे व पोषक आहार प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन ग्रा.पं.रायपूरचे सरपंच मनोजकुमार कोल्हे यांनी केले. याप्रसंगी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून आय.सी.डी.एस., प्रकल्प – गोंदिया 01 चे बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश सोनटक्के, बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले,विस्तार अधिकारी तिर्थराज ते. उके, ग्रा.पं.रायपूरचे माजी सरपंच केवलराम राहांगडाले, ओमशंकर राहांगडाले,डाँ.योगेंद्र बिसेन, जि.प.प्राथ.हिंदी शाळा रायपूर शिक्षीका विश्वकर्मा मँडम,श्री पटले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दासगांव बुज. चे अंगणवाडी सेविका उषा लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्तावना दासगांव बीट अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा आगासे व आभार अंगणवाडी सेविका ललीता बिजेवार यांनी मानले.सदर पोषण अभियान मेळावा यशस्वी करण्यासाठी रायपूरचे अंगणवाडी सेविका ललीता बिजेवार,गायत्री राहांगडाले, मदतनीस संगीता रंगारी तसेच दासगांव बीटच्या अंगणवाडी बीट परिक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस व जि.प.प्राथ. हिंदी शाळा , रायपूरचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले.